Breaking
आरोग्य व शिक्षण

HMPV व्हायरसची महाराष्ट्राला धडक! ‘या’ जिल्ह्यात सापडले २ पॉझिटिव्ह रुग्ण

0 0 2 0 8 0

नागपूर : महाराष्ट्रासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनाच्या महामारीनंतर आता एचएमपीव्ही व्हायरसने (HMPV Virus) डोकेवर काढले आहे. परदेशात पसरलेल्या या व्हारसचा प्रसार भारतातही मोठ्या प्रमाणात होत आहे. काल बंगळुरूतून दोन, कलकत्त्यातून एक, गुजरातमधून एक तर चेन्नईतून दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता या नव्या व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एचएमपीव्ही व्हायरसने महाराष्ट्रातही या नव्या व्हायरसने एन्ट्री घेतली आहे. नागपूर येथील मेडिट्रिना येथे दोन रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांचे वय ७ आणि १४ वर्ष असून सध्या यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे. तर आता भारतात HMPV ची रुग्णसंख्या ८ वर पोहोचली आहे.

 

काय आहेत HMPVची लक्षणे?

सर्दी आणि खोकला

घशाला खवखव

ताप येणे

श्वास घेण्यास अडथळा

ब्रोंकियोलाइटिस

न्यूमोनियासारखे गंभीर श्वसनाचे आजार

HMPV व्हारसचे उपाय काय?

खोकताना तोंड-नाक झाकावे.

नियमितपणे हात धुवा.

ताप-खोकला असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.

पोषणयुक्त आहार घ्या.

घरातील हवा खेळती ठेवा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे