
0
0
2
0
7
9
“प्रेरणांचा प्रवास” कार्यक्रमानिमित्त सोलापूर येथे जागतिक कीर्तीचे, कला आणि अध्यात्माचा आपल्या शिल्पातून नेहमीच दैवी आणि श्रेष्ठ अविष्कार करणारे भगवानजी रामपुरे Bhagwan Rampure यांच्या स्टुडीओला भेट देताना त्यांच्या दोन्ही मुलांचा – शिल्पकार सागर आणि देवेन – कलेतील कर्तृत्व आणि प्रतिभा पाहण्याची संधी मिळाली. रामपुरे घराण्याच्या प्रत्येक पिढीने आपल्या पूर्वसूरींचा वारसा अधिक समृद्ध केला आहे, आणि तिसऱ्या पिढीच्या कलेतील प्रगतीबद्दलच्या अद्भुत कहाण्या ऐकताना आम्ही मंत्रमुग्ध झालो. भविष्यात रामपुरे घराण्याबद्दल अधिक ऐकण्याची अपेक्षा आहे, कारण त्यांचे शिल्पकला आणि अभिव्यक्ती चित्ताकर्षक आहेत. हा अनुभव थक्क करणारा होता.
0
0
2
0
7
9