Breaking
आरोग्य व शिक्षण

स्वयंपाकघरातील ‘या’ तेलामुळे होऊ शकतो कर्करोग; जाणून घ्या निरोगी जीवनाचा आरोग्य मंत्रा….

स्वयंपाक करताना अनेक प्रकारच्या तेलाचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का जास्त प्रमाणात तेलाचे सेवन केल्यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. जास्त प्रमाणात तेलाचे सेवन केल्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. चला तर जाणून घेऊया निरोगी आरोग्यासाठी कोणत्या तेलाचे सेवन फायदेशीर ठरते.

0 0 2 0 7 9

भारतीय स्वयंपाकघरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ पाहायला मिळतात. पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये विविध प्रकारच्या तेलाचा आणि मसाल्यांचा वापर केला जातो. आजकाल मार्केटमध्ये विविध प्रकारचे तेल पाहायला मिळतात. चटकदार पदार्थांसाठी त्यामध्ये जास्त प्रमाणात तेलाचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का जास्त प्रमाणात तेलाचा वापर केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. जास्त प्रमाणात तेलाचे सेवन केल्यामुळे तुम्हाला लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि कर्करोग सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. आमेरिकेतील सरकरने केलेल्या अभ्यासानुसार, तेलाचा जास्त प्रमाणात वापर केल्यास तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता असते.आजकाल जास्त प्रमाणात जंक फूजचे सेवन केले जाते. जंक फूड बनवण्यासाठी जास्त प्रमाणात तेलाचा वापर केला जातो. त्यासोबतच अनेक ठिकाणी स्वच्छतेची सुद्धा काळजी घेतली जात नाही. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. तज्ञांच्या माहितीनुसार, सूर्यफूल, कॅनोला आणि कॉर्न यांसारख्या बियाण्यांपासून बनवलेल्या तेलाचा वापर केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कर्करोगाचा धोका वाढतो.

 

यापूर्वी झालेल्या संशोधनातही बियांच्या तेलाचे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात असे आढळून आले होते. या तेलांच्या वापरामुळे तुमच्या शरीरात जळजळ होते आणि कर्करोगाचा धोका वाडू लागतो. बियांच्या तेलाचे सेवन केल्यामुळे बायोएक्टिव्ह लिपिड कोलन कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. तेलाचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील ट्यूमरशी लढण्यापसून रोखू शकतात. परंतु या तेलांच्या वापरावर अजूनही संशोधन सुरू आहे.1900 च्या दशकामध्ये मेणबत्ती तयार करणारा विल्यम प्रॉक्टरने साबणामध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर न करता बियाण्यांच्या तेलाचा वापर केला होता. त्यानंततर काही अमेरिकन लोकांनी त्या तेलाचा समावेश त्यांच्या आहारामध्ये केला. बियाण्यांच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-6 आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात ज्यामुळे तुम्हाला पोटासंबंधीत आणि कर्करोगाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यासोबतच जास्त प्रमाणात तेलाचे सेवन केल्यामुळे तुम्हाला हृदय विकाराचा धोका वाढतो. तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये कमी प्रमाणात तेवाचा वापर करा.

 

निरोगी आरोग्यासाठी हेल्दी आणि नियमित आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या आहारामध्ये ऑलिव्ह ऑईल किंवा सूर्यफूलाच्या तेला वापर करू शकता. हे तेल पचनासाठी हलके असतात. शेंगदाण्याचे तेल आणि सोयाबिनचे तेल तळणीच्या पदार्थांसाठी उत्तम पर्याय ठरतो. पदार्थामध्ये चांगला सुगंध येण्यासाठी तुम्ही तीळाच्या किंवा खोबरेल तेलाचा वापर करू शकता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे