Breaking
आरोग्य व शिक्षण

हिवाळ्यात ब्रेकफास्टमध्ये ‘हे’ खा, अल्पावधीत तंदुरुस्त व्हाल

तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्न करत असाल तर त्यात तुम्ही रोजच्या डाएटमध्ये स्प्राऊटचे सेवन करून कंटाळा आला असेल तर तुम्ही या कोणत्या गोष्टींच्या स्प्राऊट्सचा समावेश तुमच्या आहारात करून खाऊ शकतात. यामुळे तुम्हाला पौष्टिक तसेच चवदार प्रथिनांसह अनेक प्रकारचे पोषक घटकही आरोग्यास मिळतील.

0 0 2 0 7 9

विधानसभा निवडणूक

LATEST NEWS

महाराष्ट्र

मुंबई

पुणे

क्रीडा

सिनेमा

वेब स्टोरीज

राष्ट्रीय

राजकारण

क्राईम

Videos

फोटो गॅलरी

आंतरराष्ट्रीय

राशीभविष्य

बिझनेस

हेल्थ

लाईफस्टाईल

अध्यात्म

Marathi News Health Eat these food in breakfast, you will be fit in a short time

 

हिवाळ्यात ब्रेकफास्टमध्ये ‘हे’ खा, अल्पावधीत तंदुरुस्त व्हाल

तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्न करत असाल तर त्यात तुम्ही रोजच्या डाएटमध्ये स्प्राऊटचे सेवन करून कंटाळा आला असेल तर तुम्ही या कोणत्या गोष्टींच्या स्प्राऊट्सचा समावेश तुमच्या आहारात करून खाऊ शकतात. यामुळे तुम्हाला पौष्टिक तसेच चवदार प्रथिनांसह अनेक प्रकारचे पोषक घटकही आरोग्यास मिळतील.

हिवाळ्यात ब्रेकफास्टमध्ये ‘हे’ खा, अल्पावधीत तंदुरुस्त व्हाल

Follow us

google-news-icon

स्नेहल. चं. मेंगळ

स्नेहल. चं. मेंगळ | Updated on: Jan 07, 2025 | 1:29 PM

आपल्या रोजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे फिट आणि हेल्दी राहण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. कारण अनेकांना वजन वाढण्याच्या समस्या सतावत आहेत. जेव्हा तुम्ही वाढत्या वजनाने त्रस्त झालेले असता तेव्हा वजन नियंत्रणासाठी प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा विचार करता. तेव्हा बहुतेक लोकं डाएट करण्याची शिफारस करतात, अशातच अनेकजण त्यांच्या आहारात स्प्राऊटचे समावेश करतात. कारण स्प्राऊट्समध्ये अनेक पोषक तत्वांचा खजिना देखील आहे. मात्र दैनंदिन प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी अनेक असे काही स्प्राउट्स आहेत जे तुम्ही डाएट मध्ये समावेश करू शकतात. ज्यामुळे तुम्हाला प्रथिने तसेच इतर अनेक पोषक तत्वे मिळतील. जर तुम्ही रोज तेच-तेच स्प्राउट्स खाऊन कंटाळला असाल आणि याव्यतिरिक्त तुम्ही स्प्राउट्ससाठी वेगवेगळे प्रोटीनयुक्त पदार्थ शोधत असाल तर या स्प्राऊटसचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा.वजन कमी करण्यासोबतच स्नायूंना बळकटी देण्यासाठी काही डाळीचे स्प्राउट्स खाणे खूप फायदेशीर आहे. तुमच्या आरोग्यासाठीही याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया वजन नियंत्रणात कोणत्या गोष्टी उपयुक्त ठरतात.मेथी स्प्राउट्स आरोग्यदायी

मधुमेह रुग्णांसाठी स्प्राऊटचे सेवन लाभदायक आहे. चण्याचे स्प्राऊट, शेंगदाणे स्प्राऊट, या गोष्टींचे स्प्राउट्स मधुमेह असलेल्या लोकांसाठी हानिकारक नसतात, पण याव्यतिरिक्त ज्या लोकांची रक्तातील साखर नेहमी उच्च असते त्या मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात मेथीदाण्याचे स्प्राउट्स समाविष्ट केले तर ते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे वजनही नियंत्रणात राहील.

 

चण्याचे स्प्राउट्स

डाळींऐवजी तुम्ही नाश्त्यात चण्याच्या स्प्राऊट्सचे समावेश करू शकतात. कारण चण्याचे स्प्राऊट्स प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे. याशिवाय चण्याच्या स्प्राउट्समध्ये लोह, फायबर, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. चणा स्प्राउट्समध्ये लिंबाचा रस व थोडे मीठ आणि मिरपूड टाकल्यास चव दुप्पट होते.

 

शेंगदाणे स्प्राउट्स

अनेकजण वजन कमी करण्यासाठी त्याच्या आहारात प्रथिनांसाठी बाजारात उपलब्ध असलेले पीनट बटरचे अधिक सेवन करतात. परंतु बाजारात मिळणाऱ्या पीनट बटरमध्ये अस्वास्थ्यकर फॅट असते आणि बरेच प्रिजर्वेटिव घटक देखील असतात, ज्यामुळे फायद्याऐवजी आरोग्यास हानी पोहोचू शकते. म्हणूनच तुमच्या आहारात पीनट स्प्राउट्सचा समावेश करणे हा एक वजन नियंत्रित करण्यासाठी चांगला पर्याय आहे.

 

हिवाळ्यात बनवा या धान्याचे स्प्राऊट

थंडीच्या दिवसात बाजरीचे सेवन भरपूर परमनंट केले जातात. कारण बाजरीच्या सेवनाने शरीर आतून उबदार राहते. यासाठी जी लोक डाएट करत आहेत त्यांनी बाजरीचे स्प्राउट्स आहारात समाविष्ट करून घेऊ शकतात. हे एक गरम धान्य असले तरी यात प्रथिने, फायबर आणि बऱ्याच पोषक तत्वांनी समृद्ध आहे. हे आतड्याचे आरोग्य सुधारते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. याशिवाय दम्याच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे.

 

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे