Breaking
ब्रेकिंग

Express : प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी तपोवन एक्सप्रेस एक किलोमीटर आली मागे

0 0 2 0 7 9

मनमाड : एखाद्याला जीवनदान देण्यासारखे पुण्याचे काम या जगात दुसरे नाही त्यात जर एखाद्या धावत्या रेल्वेमधुन जर कुणी पडले असेल तर त्याच्यासाठी रेल्वे थांबत नाही असे आपण नेहमीच बघतो मात्र आज याउलट घटना घडली आहे.

मुंबई वरून नांदेड कडे जाणारी तपोवन एक्सप्रेस मनमाड यार्डात (हद्दीत) आली असतांना एक प्रवाशी पडला असल्याचे समजले आणि काय मग रेल्वे ड्रायव्हर आणि गार्डने थेट एक ते दिड किलोमीटर मागे घेतली व इतर प्रवाशांच्या मदतीने जखमी असलेल्या सहप्रवाशाला गाडीत टाकून मनमाड रेल्वे स्थानकावर आणले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस मुंबईवरून नांदेड कडे जात असताना मनमाड नजीक अर्थात मनमाड आल्यानंतर या गाडीतून एक प्रवासी पडल्याची घटना घडली गाडी पुढे गेली असता शेवटच्या बोगीत असलेल्या गार्डच्या लक्षात हा प्रकार आला गार्डने तात्काळ इंजिन ड्रायव्हरसोबत संपर्क साधला व सर्व कल्पना दिली ड्रायव्हरला सर्व माहिती मिळेपर्यंत गाडी दीड ते दोन किलोमीटर पुढे निघून आली होती. ड्रायव्हरने तात्काळ गाडी थांबवली व दोन किलोमीटर गाडी मागे घेतली सहप्रवाशांना घेऊन गाडीच्या गार्डने जखमी प्रवाशाला गाडीत टाकले.

रेल्वे स्थानकावर तात्काळ रुग्णवाहिका ही उपलब्ध करून देण्यात आली. जखमी प्रवाशाला उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. रेल्वे ड्रायव्हर गार्ड व इतर प्रवाशांचे अथक प्रयत्न करूनही तो प्रवासी वाचू शकला नाही. तो प्रवासी कोण होता कुठला होता याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकली नाही. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे