ग्रीन एन क्लिन शिर्डी फाउंडेशन व शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने १३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महापरिक्रमेच्या उद्घोषणा सोहळ्या

ग्रीन एन क्लिन शिर्डी फाउंडेशन व शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने १३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महापरिक्रमेच्या उद्घोषणा सोहळ्यात आज सहभागी होण्याचा योग आला.
या विशेष प्रसंगी उपस्थित राहून परिक्रमेच्या उद्घोषणेची विधिवत सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांसोबत भजनाच्या सुरेल तालावर आनंदाने नाच देखील केला. तसेच शिर्डीच्या परिक्रमेमध्ये सहभागी होताना शेतांमधील गव्हाच्या पिकांची पाहणी केली. त्याचप्रमाणे, परिक्रमेदरम्यानची दृश्ये आणि अनुभव चित्रीकरणाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली, जेणेकरून या अनोख्या सोहळ्याचा आनंद सर्वांना घेता येईल.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्य. अधि. श्री. गोरक्ष गाडीलकर, उपविभागीय पो. अधि. श्री. शिरीष वमने, श्री. अभयभैय्या शेळके, श्री. गोपीनाथ बापू गोंदकर, श्री. विजयराव जगताप, ज्येष्ठ नेते श्री. दिंगबर कोते, साई निर्माण उद्योग समुहाचे श्री. विजय कोते, श्री. ताराचंद कोते, महंत काशिकानंदजी सरस्वती महाराज, श्री. कमलाकर कोते, श्री. रविंद्र गोंदकर, ग्रीन एन क्लिन शिर्डीचे श्री. अजित पारख, ॲड. अनिल शेजवळ, श्री. संजय शिर्डीकर, श्री. मनिलाल पटेल, श्री. गणेश कोते, श्री. अजय नागरे, श्री. जगन्नाथ गोंदकर, डॉ. जितेंद्र शेळके, श्री. दत्ता कोते, श्री. नितिन शेळके, श्री. आप्पासाहेब कोते, श्री. प्रताप जगताप आदींसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.