Breaking
ब्रेकिंग

आनंदी जीवन !!!

आनंदी जीवन !!!

0 0 2 0 7 6

आनंदी जीवन  !!!

नमस्कार मित्रांनो,
आज बऱ्याच दिवसातून काहीतरी लिहावंसं वाटलं म्हणून भावना व्यक्त करत आहे.

संपूर्ण सृष्टी ही एक भौतिक मायाजाल आहे.
या सृष्टीवर नियंत्रण ठेवणारी एक दिव्य अदृश्य शक्ती आहे. ज्या दिव्य शक्तीवर आपण सर्वजण विश्वास ठेवतो.

अचानक कुणाला प्रश्न विचारला की, तुम्ही भगवंताला पाहिले आहे का?
तर उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असेल.
कुणी म्हणेल भगवंत तर मंदिरात आहे,
कुणी म्हणेल भगवंत तर दगडाच्या मूर्तीत आहे,
कुणी म्हणेल भगवंत तर माणसात आहे,
कुणी म्हणेल प्राण्यांमध्ये ,कुणी झाडामध्ये तर कुणी म्हणेल सृष्टीच्या  कणाकणांमध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे.
या प्रकारचे उत्तर ज्याच्या त्याच्या भगवंतावर असलेल्या श्रद्धेवर आणि विश्वासावर असेल.

प्रत्येकाला कुठेतरी स्वतःला बांधून ठेवावेच लागते. त्याच्याशिवाय जीवन जगणे सोपे जाणार नाही.
सृष्टी निर्माण करणारा, पालन पोषण करणारा आणि संहार करणारा भगवंत एकच आहे फक्त वेगवेगळ्या रूपांमध्ये अवतीर्ण झालेला आहे.

भगवंत हा प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तूच्या हृदयात अति सूक्ष्म रुपात आहे आणि आपल्या चांगल्या व वाईट कर्माचा साक्षीदार सुद्धा भगवंत आहे.

चोरी करणाऱ्याला वाटत मला कुणी पाहत नाही पण त्याने केलेली चोरी तो स्वतःपासून आणि भगवंतापसून लपवू शकत नाही.

भगवंताने आपल्या सर्वांना मनुष्य जन्म देऊन एक सुवर्ण संधी दिलेली आहे.
“एक उत्तम आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी”

आपण सर्वजण कशाप्रकारचे जीवन जगत आहोत हे स्वतःलाच विचारून आपल्यालाच पहायचे आहे.

आपल्या कर्मामुळे कुणाला शारीरिक किंवा मानसिक इजा होत आहे का याचे परीक्षण करणे खूप महत्वाचे आहे.

आपल्या स्वतःच्या अहंकारामुळे (मीपणामुळे) कुणी दुःखी आहे का? असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे.

आपले मन नेहमी गंगाजलाप्रमाणे निर्मळ ठेवले पाहिजे.
राग, द्वेष , तिरस्कार या दुष्ट भावनांपासून स्वतःला आपणच दूर ठेवले पाहिजे व सतत जागरूक राहिले पाहिजे.

आपण सामाजिक विचारांना बदलू शकत नाही पण जर ठरवलं तर स्वतःला बदलून समाजाचा दृष्टिकोन आपण नक्कीच बदलू शकतो.

आपल्यासोबत आपल्या संघर्षात कुणी साथ देईल अथवा नाही देणार पण अदृश्य शक्ती जीला आपण भगवंत म्हणतो ती नक्कीच आपल्या सोबत राहून आपल्याला मदत करते.
ज्याला आपण आत्मविश्वास म्हणतो. कारण आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणातून एक भाव येत असतो , त्या भावाचे रूपांतर एका सकारात्मक विचारात होते, हाच विचार शब्दरूपी प्रकट होऊन आपल्याला चांगली कृती किंवा कर्म करण्यास मदत करतो.

आपण फक्त चित्त एकाग्र ठेऊन लक्ष ठेवले पाहिजे.
मन हे चंचल आहे त्याला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

प्रत्येकाला वैयक्तिक स्वतःच्या इच्छेनुसार सर्व काही भेटतच असं नाही .

सर्व काही ठरवणारा ,देणारा आणि घेणारा भगवंत आहे अशी ज्याची श्रद्धा आणि विश्वास असतो तो प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहून स्थिर असतो. कारण त्याला विश्वास असतो की सर्व काही भगवंताच्या हातात आहे आणि भागवंताचेच आहे आपण फक्त निमित्त आहोत.

प्रत्येकाला भगवंतानी चमत्काराचे अनुभव दिलेले असतात फक्त कोण किती त्यावर ठाम आहे याची परीक्षा वेळोवेळी भगवंत घेत असतो.
कारण या प्रकृतीच्या भौतिक मायानगरीत प्रत्येकजण गुरफटून गेलेला आहे. पावलोपावली येणाऱ्या नवनवीन संकटामध्ये स्वतःला अडकवून ठेवलेले आहे त्यामुळे आपण दुःख अनुभवतो आणि स्वतःचे अस्तित्व विसरून जातो.

सुखात आणि दुःखात राहण्याचे कारण आपलेच सकारात्मक आणि नकारात्मक विचार असतात. कोणत्या विचारांना किती महत्व द्यायचे व कोणत्या विचाराकडे दुर्लक्ष करायचे हे आपणच ठरवायचं असत.

स्वतःचा आनंद स्वतःच घेणे व इतरांना देणे ही आपलीच जबाबदारी आहे.

आपल्याला कुणामुळे तरी आनंद भेटेल, प्रेम भेटेल किंवा कौतुकाचे दोन शब्द भेटतील याची अपेक्षा कधीच कुणाकडून ठेवायची नाही कारण जिथे अपेक्षा तिथेच अपेक्षाभंग होण्याची शक्यता जास्त असते.

जो आपल्याला आपलं समजतो तो नक्कीच आपण न बोलता आपल्या भावना समजून घेईल. आपल्या जवळ येईल.

ज्याच्या मनात आपल्या बद्दल राग आहे किंवा द्वेष , तिरस्कार आहे तो आपल्या जवळ तर नाहीच पण नजरेला नजर सुद्धा देऊ शकत नाही.
कारण मनातील भावना आपली शुद्ध तर समोरच्याची अशुद्ध असू शकते.

त्यामुळे आपण सर्वांमध्ये राहून निस्वार्थ भावाने सत्कर्म करायचे.

स्वतःची भूमिका कधीच विसरायची नाही प्रत्येक परिस्थिती किंवा घटनेत आपल्याला एक नाट्यछटा अनुभवायची आहे याचे स्मरण ठेवून जीवन आनंदाने जगायचे.

ज्याठिकाणी आपला प्रामाणिकपणा सिद्ध करून दाखवण्यासाठी आपल्याला व्यक्त व्हावे लागते तिथे कधीच घाबरायचे नाही. चूक असेल तर क्षमा मागण्यासाठी किंवा करण्यासाठी जास्त वाट न पाहता लगेच क्षमा मागून किंवा करून मोकळे व्हायचे. त्यामुळे मन हलके होते.

आपले सर्वांचे जीवन खूप आनंदाने भरलेले आहे,
फक्त जीवनातील आनंद शोधून आनंदानेच आनंद घायचा. ही एक आनंदी जीवनाची कलाच आहे फक्त ज्याची त्याला अवगत करावी लागेल.

काही चुकले असेल तर क्षमा असावी.

आपलाच,
श्रीकृष्ण भक्त ,
अक्षय शिरसाठ.

5/5 - (3 votes)

साप्ताहिक आरोग्यधारा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे