Breaking
ब्रेकिंग

हिवाळ्यात शरीराला सूर्यप्रकाश न मिळाल्यास मानसिक आरोग्य ढासळण्याची भीती; दिवसभर घरात राहण्याची सवय ठरु शकते घातक

0 0 2 0 7 9

Winter health Care: हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी बरेचजण घरीच राहणं पसंत करतात. थंडीमुळे अनेकदा लोक बाहेर जाणे टाळतात. यामुळे ही मंडळी प्रत्यक्ष सूर्यप्रकाशापासून दूर राहतात. दिवसभर घरात राहिल्याने शरीराला हव्या सूर्यप्रकाशाची कमतरता भासू लागते आणि याचा परिणाम थेट मानसिक आरोग्यावर होतो. शरीराला हवे पुरेसं ऊन न मिळत नसल्याने त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळतात.

वैज्ञानिकांच्या मते ऊन्हापासून मिळणारे व्हिटॅमिन डी शरीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्हिटॅमिन डी हाडांना मजबूत बनवण्यासोबतच मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी खूपच उपयुक्त असते.

ऊन्हामुळे शरीरातील सेरोटोनिन होर्मोनची वाढ होते. शरीरातील या होर्मोनला हॅप्पी होर्मोन असे देखील म्हटले जाते. हा होर्मोन डीप्रेशनला दूर करुन मूड चांगला ठेवण्यासाठी कारणीभूत ठरतो. हिवाळ्यात ऊन्हापासून दूर राहिल्याने शरीरातील सेरोटोनिन होर्मोनची पातळी घटू शकते. हॅप्पी होर्मोनच्या पातळीत घट झाल्याने तणाव, चिंता, डीप्रेशन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. शास्त्रज्ञांच्या मते, हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असते. यामुळेच या ऋतूमध्ये लोक उन्हात हवा तितका वेळ घालवू शकत नाहीत. शरीराला पुरेसे ऊन न मिळाल्याने त्याचा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

सर्याच्या प्रकाशाचे महत्त्व

प्रकाश हा व्हिटॅमिन डीचा उत्तम आणि नैसर्गिक स्त्रोत आहे. सूर्याचा प्रकाश फक्त हाडांसाठीच नव्हे तर मेंदूच्या कार्यक्षमतेसाठीसुद्धा फायदेशीर असतो. ऊन्हामुळे सेरोटोनिनच्या पातळीत वाढ होऊन डीप्रेशन आणि तणावासारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यास मदत होते. सूर्याचा प्रकाश शरीरातील मेलाटोनिन होर्मोन सुद्धा नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे आपल्या झोपेच्या चक्रात सुधार होण्यास मदत होते.

ऊन्हात किती वेळ घालवावा?

सकाळच्या कोवळ्या ऊन्हात 15-20 मिनिटे नक्की बसा.

ऑफिसला जाते वेळी मोकळ्या हवेत फेरफटका मारा.

घरात ज्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश येत असेल अशा ठिकाणी बसा.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे