ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
सोलापूर: आरक्षणप्रश्नी राजेंद्र राऊत यांचे बार्शीत ठिय्या आंदोलन सुरू
मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलनाचे मनोज जरांगे-पाटील यांच्याविरुद्ध आरोपसत्र आरंभल्यानंतर बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
0
0
1
6
5
6
सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलनाचे मनोज जरांगे-पाटील यांच्याविरुद्ध आरोपसत्र आरंभल्यानंतर बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, तसेच मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत सर्वच पक्ष, नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आमदार राऊत यांनी या वेळी केली आहे.बार्शीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह आमदार राऊत यांनी सकाळी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी त्यांना विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा मिळाला.
0
0
1
6
5
6