Breaking
आरोग्य व शिक्षण

राज्यात चिकनगुनियाने हातपाय पसरले; ऐन थंडीत हातपायांना ठणक, रुग्ण संख्येत वाढ

राज्यात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक ५ हजार ७५७ रुग्ण २०२४ मध्ये सापडले आहेत. ऐन थंडीत नागरिकांच्या हातपायांना ठणक लागली आहे. राज्यातील या शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहे.

0 0 2 0 8 0

राज्यात चिकनगुनियाने हातपाय पसरले आहे. राज्यात रुग्ण संख्या वाढली आहे. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक ५ हजार ७५७ रुग्ण २०२४ मध्ये सापडले आहेत. ऐन थंडीत नागरिकांच्या हातपायांना ठणक लागली आहे. राज्यातील अनेक शहरात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले आहे. मुंबईसह अनेक शहरात या रोगाने डोके वर काढले आहे. तर नागपूर येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे.

राज्यात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले

थंडीचा कडाका पु्न्हा वाढला आहे. तर मुंबई सारख्या शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. पालिका क्षेत्रात न्यूमोनिया, चिकनगुनिया आणि विषाणूजन्य आजारात वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चिकनगुनियच्या रुग्ण संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्य आरोग्य खात्याने महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत.नागपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण

राज्यात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक ५ हजार ७५७ रुग्ण २०२४ मध्ये सापडले आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर आणि दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे.यंदा रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्याने वैद्यकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या दरम्यान मुंबईत ७३५ रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूर आणि पुण्यानंतर मुंबईत रुग्ण संख्या वाढलेली आहे.

चिकनगुनिया विषाणूजन्य आजार

चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांच्या संक्रमित मादीपासून फैलावतो. डेंग्यूसारखी लक्षणे असली तरी या आजारासाठी भिन्न उपचारांची आवश्यकता असते. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत रूग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.

चिकनगुनियाचा चढता आलेख

मुंबईत गेल्या वर्षात, १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या दरम्यान मुंबईत ७३५ रुग्णांची नोंद झाली आहे. २०२२ मध्ये चिकनगुनियाचे १८ रुग्ण आढळले होते. तर २०२३ मध्ये २५० रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा ही संख्या ४८५ नीं वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. राज्य आरोग्य विभागाने पालिकेच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे