Breaking
आरोग्य व शिक्षण

Kumbhmela 2025 : कुंभमेळ्यावर HMPV व्हायरसचं सावट! चीनमधून येणाऱ्या लोकांना थांबवा…

0 0 2 0 8 0

लखनऊ : चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं होतं. त्यानंतर चीनने पुन्हा एका नव्या व्हायरस उकळून काढला आहे. कोविड-१९नंतर आता एचएमपीव्ही व्हायरस देशभरात पसरल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हारसची लागण वेगाने होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. अशातच आता या चीनी व्हायरसचं सावट उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही पसरले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशच्या साधू-संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.देशविदेशातून कोट्यवधी लोक कुंभमेळ्याला येतात. याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. जाणून घ्या या पत्रात काय लिहले.

 

‘चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. १२ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरु होणार आहे. देशात चीनी HMPV चे तीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडालीय. कुंभमेळ्याला होणारी गर्दी लक्षात घेता खबरदारी घ्यायलाच हवी. अन्यथा पुन्हा कोरोनासारख्या भयावह परिस्थितीचा देशाला सामना करावा लागेल’, असे पत्रात म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे