Breaking
आरोग्य व शिक्षण

Health: या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे काहीजणांना जास्त वाजते थंडी, तुम्हीही त्यातलेच आहात का?

0 0 2 0 8 0

मुंबई: हिवाळ्यामध्ये थंडी वाजणे हे सामान्य आहे. मात्र प्रमाणापेक्षा अधिक थंडी वाजणे हे ही योग्य नाही. खरंतर, तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांना इतरांच्या तुलनेत जास्त थंडी लागते. त्यांना थोडीशी थंड हवा लागली तरी थंडी वाजते. मात्र तुम्ही विचार केलाय का की असे का होत असेल? काही लोकांना प्रमाणापेक्षा अधिक थंडी वाजते. याचे कारण शरीरामध्ये असलेल्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळेहे व्हिटामिन केवळ एकाच प्रकारचे नाही तर तीन प्रकारचे असतात. शरीरात व्हिटामिन डी, व्हिटामिन बी१२ आणि व्हिटामिन सीच्या कमतरतेमुळे काही लोकांना अधिक थंडी वाजते. व्हिटामिन डी केवळ हाडांच्या मजबुतीसाठी गरजेचे नही तर यामुळे शरीराचे तापमानही बॅलन्स राखण्यात मदत होते.

 

 

अशातच तुमच्या शरीरात व्हिटामिन डीची कमतरता असेल तर तुम्हाला नॉर्मल लोकांपेक्षा जास्त थंडी वाजू शकते. व्हिटामिन बी१२च्या कमतरतेमुळेही शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. शरीरात रक्ताची कमतरता असणे याचा अर्थ योग्य प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा न होणे. याच कारणामुळे जास्त थंडी वाजू शकते.

व्हिटामिन सीमुळे आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत राखली जाते. जर शरीरात व्हिटामिन सीची कमतरता असेल तर इम्युनिटी कमकुवत होते. इम्युनिटी कमकुवत असल्यास तुम्हाला जास्त थंडी वाजू शकते. इतकंच नव्हे तर खोकला आणि सर्दीचाही त्रास होऊ शकतो.

जर तुम्हाला वाटतं असेल की थंडीच्या दिवसांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त थंडी वाजू नये तर तुम्हाला डाएटमध्ये बदल करावा लागेल. तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये पनीर, दूध, डेअरी उत्पादने, मशरूम, आंबट फळे, पपई, मासे आणि चिकनचा समावेश करावा लागेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे