आरोग्य व शिक्षणई-पेपर

Low back pain : पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? ‘हे’ पदार्थ पूर्णत: बंद करा

0 0 1 6 5 6
Low back pain : दिवसभराच्या बैठ्या कामांनी अनेकदा आपली पाठ अवघडत लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम असल्याने बसून काम करण्याशिवाय पर्याय नसतो. सकाळी लवकर उठून-आवरून आपण जे कामाला सुरुवात करतो, ते संध्याकाळ आणि रात्र कधी होते तेही कळत नाही. रात्री आपण पाठ टेकतो तेव्हाच काय तो पाठीला आराम मिळतो. त्यात पाठदुखी ही कोणत्याही वयातील व्यक्तीसाठी समस्या बनू शकते. तुम्हालाही पाठीत हलके दुखणे सतत होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यावर वेळीच उपचार करा. एकाच आसनात बराच वेळ बसल्याने पाठदुखी होते. पण, जर ही समस्या तुम्हाला बराच काळ त्रास देत असेल तर थोडी काळजी घ्या. कारण- ही गंभीर आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर पाठदुखीची समस्या असेल, तर काही पदार्थांपासून तुम्ही दूर राहणे गरजेचे आहे.
हे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घेऊ.  ज्यांना पाठदुखीची समस्या आहे त्यांनी साखर, साखरयुक्त सिरप, मका आणि तेल याचा आहारात समावेश करू नये. नैसर्गिक वा प्रक्रिया न केलेला मका हा आरोग्यदायी असला तरी प्रक्रियेदरम्यान त्यातील पोषक तत्त्वे निघून जातात आणि त्याचा आपल्या शरीरावर वेगळा परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आहारात मक्याचा समावेश करीत असाल, तर तो प्रक्रिया केलेला नसावा. प्रक्रिया केलेला मका खाल्ल्यानं पाठीच्या खालच्या वेदना वाढू शकतात.
 “प्रक्रिया केलेल्या मक्यामुळे इन्सुलिनच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते आणि त्यामुळे जळजळ आणि वजन वाढू शकते. जास्त वजनामुळे मणक्यावर अतिरिक्त ताण पडतो आणि पाठीच्या खालच्या भागात दुखणे वाढते.” तसेच यामुळे जळजळ बरे होण्याची प्रक्रिया मंद होऊ शकते आणि पाठीच्या खालच्या भागात दुखण्यासारखी परिस्थिती वाढू शकते.
“मक्यामध्ये बी जीवनसत्त्व आणि खनिजे, तसेच फायबर असते; मध्यम प्रमाणात सेवन केल्यास एकूण आरोग्यासाठी हे घटक चांगले असू शकतात. संपूर्ण मक्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.” डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दाहकविरोधी आहारामुळे पाठदुखी कमी होण्यास मदत होते. भरपूर फळे आणि भाज्या खाणे आवश्यक आहे. कारण- त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साप्ताहिक आरोग्यधारा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 6 5 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे