आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजन
Video: सूरज चव्हाणला येतेय गावची आठवण, म्हणाला, “मी साधा आणि सनकी आहे, पण इथे…”
Bigg Boss Marathi Season 5 : "मी राग आल्यावर असा माणूस आहे की, पुढचं मागचं बघत नाही," सूरज चव्हाण म्हणाला.
0
0
1
6
5
6
Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सातवा आठवडा सुरू असून सध्या कॅप्टन्सीचा टास्क पार पडत आहे. अरबाज पटेल, धनंजय पोवार, वैभव चव्हाण, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे पाच सदस्य कॅप्टन्सीसाठी उमेदवार आहे. सातव्या आठवड्याचा कॅप्टन निवडण्यासाठी ‘जादुई हिरा’ मिळवून कॅप्टन्सीसाठीच्या पाच उमेदवारीतील एका सदस्याला बाद करायचं आहे. गुरुवारी झालेल्या भागात ‘जादुई हिरा’ जान्हवी किल्लेकर आणि वैभवने उचलला. त्यामुळे जान्हवीने अरबाज तर वैभवने सूरजचं नाव कॅप्टन्सीमधून बाद केलं. आता धनंजय, वैभव आणि वर्षा उसगांवकरांमधील कोण सातव्या आठवड्यासाठी कॅप्टन होतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच सूरजला गावची आठवण येत आहे. यासंबंधित सूरजचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
0
0
1
6
5
6