आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

Fever : ताप आलाय? मग ‘हा’ घरगुती उपाय ठरेल जादुई; रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास होईल मदत

wet sock method to reduce fever in children and adults : रात्री अचानक ताप आल्यावर आपल्यातील अनेक जण 'थंड पट्ट्या' डोक्यावर ठेवतात...

0 0 1 6 5 6

Harmful effects of high fever on teeth | Smile Brilliant

wet sock method to reduce fever in children and adults : सध्या हवामानात सतत बदल होत असल्यामुळे ताप, सर्दी, खोकला यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रात्री अचानक ताप आल्यावर आपल्यातील अनेक जण ‘थंड पट्ट्या’ डोक्यावर ठेवतात. आपल्यातील बरेच जण वर्षानुवर्षे हा उपाय करत आले आहेत. पण, आज ताप कमी करण्यासाठी आम्ही यासारखाच पण, थोडा ट्विस्ट असणारा एक उपाय घेऊन आलो आहोत. त्या उपायाचे नाव आहे ‘ओले मोजे’ (wet sock method). ही पद्धत इन्स्टाग्रामवर एका कन्टेन्ट क्रिएटरने सांगितली आहे.

कन्टेन्ट क्रिएटरच्या मते, ताप आल्यावर मुलांना थंड, ओले मोजे घालायला लावणे आणि नंतर कोरडे, लोकरीचे मोजे घालणे ही कृती ताप (Fever) कमी करण्यास मदत करू शकते. “थंड मोजे रक्ताभिसरणाला चालना देतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तुमच्या शरीरातील तापाच्या उष्णतेमुळे थंड मोजे गरम होतात. त्याद्वारे शरीरातील रक्तप्रवाह चांगल्या प्रमाणात वाढतो आणि नैसर्गिकरीत्या ताप कमी होण्यास मदत मिळते”, असे त्या कन्टेन्ट क्रिएटरचे म्हणणे आहे.त्याचबरोबर या पोस्टमध्ये लिहिण्यात आले होते की, हा उपाय सुरक्षितरीत्या नैसर्गिक ताप (Fever) कमी करून, रोगप्रतिकारासाठी शरीराचा प्रतिसाद अन् रक्ताभिसरण वाढवतो. त्यामुळे आजारपणात चांगली झोप येण्यास मदत होते. तसेच हा उपाय केल्यावर इतर औषधोपचारांची गरज भासत नाही, असेदेखील त्यांनी नमूद केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साप्ताहिक आरोग्यधारा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 6 5 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे